◼️ काव्यरंग : लढण्यास दिले तुम्ही बळ

लढण्यास दिले तुम्ही बळ

स्त्री शिक्षणासाठी ज्यांनी
झेलली चिखलमाती
खरोखरच वाघीण होती
ज्योतिबांची सावित्री

शिक्षित करण्या समाज इथला
त्यांनी झेलला शिव्याशाप
सावित्री झाली माय अज्ञानांची
अन् ज्योतिबा तयांचा बाप

कष्ट करून समाजाला ज्यांनी
अक्षरांची दुनिया धावली
त्यांच्यामुळेच तुमची माझी
जिंदगानी सावरली

मनगटात आमच्या लढायला
बळ दिलेत तुम्ही
देह तुमचा अखेरपर्यंत
आला समाजाच्याच कामी

स्री शिक्षणासाठी ज्यांनी
झुगारले संकटांचे बंधन
धन्य धन्य त्या ज्योतिबांना
अन् सावित्रीला वंदन..!!

◼️🔷◼️🔷◼️🔷◼️◼️🔷◼️🔷◼️🔷◼️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *