◼️ काव्यरंग :- रंगेल लावणी

!!.. रंगेल लावणी ..!!

पेरा पेरात जवानी भरली
चोळी घामान भिजली.. !!धृ !!

गोरी गोरी काया माझी
तुमच्या मनाला भावली
पेरा पेरात जवानी भरली
चोळी घामान भिजली..!1!

मारू नका गालावर टिचकी
मी लाखात आहे बघा देखणी
माझ्या दिलाच्या या कोंदनी
तुमची मुरत काळजात बसली..!2!

तुम्हासाठीच जपली ही काया
तुमच्या सोबत चाले अनवाणी
कशी सांभाळू माझी जवानी
तुमच्या स्पर्शानं शिरशिरी उठली..!3!

रंभा अप्सरा उर्वशी मी हो
सारा तुमच्यात जिव हा रमवा
माझी करा तुम्ही मनधरणी
अंगात मस्ती ही मुसमुसली..!4!

मा.जिल्हा संघटक “संभाजी ब्रिगेड”
संभाजीनगर औरंगाबाद, मो. 9325294198

◼️🔷◼️🔷◼️🔷◼️🔷◼️🔷◼️🔷◼️🔷◼️🔷◼️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *