◼️ काव्यरंग :- मृगनयनी तू अप्सरा

 मृगनयनी तू अप्सरा

मनमोहिनी जणू भूवरी
चुकवूनी आली नजरा
सौंदर्य तुझे भुलविते
मृगनयनी तू अप्सरा!

बटा तुझ्या लडीवाळ
ढाळीती चवर्‍या चेहेर्‍यावर
खळी मोहक गालावर
तीळाची तीट हनुवटीवर!

केतकी रंग खुलवितो
तारुण्यास तुझ्या बहर
नयनांवर पापण्यांची गस्त
नेत्रकटाक्ष करिती कहर!

ओठ तुझे अंजिरी
हास्य चंचल मधुर
लावण्य तुझे आरसपानी
लावी ह्रृदयास हूरहूर!

स्वप्नपरी भाससी अधिक
हाती कंकण किणकिणती
चाल तुझी मादक
पायी पैंजण झंकारिती!

◼️🔷✍️🔷◼️

◼️ सौ प्रिया प्रकाश गावडे, ठाणे 

◼️🔷◼️🔷◼️🔷◼️🔷◼️🔷◼️🔷◼️🔷◼️🔷◼️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *