पालकमंत्री विजय वडेट्टीवार चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

पालकमंत्री विजय वडेट्टीवार चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

चंद्रपूर, दि. 11 ऑक्टोंबर : महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, इतर मागास, बहुजन कल्याणमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार  12 व  13 ऑक्टोंबरला  चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.

त्यांचा दौरा कार्यक्रम असा आहे. 12 ऑक्टोंबरला  सकाळी 9 वाजता कमलाई निवास, रामदास पेठ नागपूर वरून ब्रह्मपुरीकडे प्रयाण करतील. सकाळी 11.30 वाजता शासकीय विश्रामगृह ब्रह्मपुरी येथे आगमन व ब्रह्मपुरी तालुक्यातील सर्व विभागांच्या विकासकामांबाबत आढावा बैठक घेणार आहेत. दुपारी 1:30 वाजता महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांसोबत बैठक असणार आहे. दुपारी 2.30 ते 3.30 त्यांचा वेळ राखीव असणार आहे. सायंकाळी 4 वाजता ब्रह्मपुरी वरून गडचिरोलीकडे प्रयाण करतील. सायंकाळी 4.30वाजता शासकीय विश्रामगृह गडचिरोली येथे आगमन व रानफुल निवास गडचिरोली येथे मुक्काम असणार आहे.

13 ऑक्टोंबरला सकाळी 10 वाजता गडचिरोली येथुन चंद्रपूर कडे प्रस्थान करतील. सकाळी 11:30 वाजता चंद्रपूर येथे आगमन व कोविड-19 बाबत जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेणार आहे. दुपारी 2.30 ते 4.30 वाजता त्यांचा वेळ राखीव असणार आहे. सायंकाळी 5 वाजता चंद्रपूर वरून नागपूरकडे प्रस्थान करतील.◼️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *