◼️ काव्यरंग :- माणूस_हो..!!

माणूस_हो..!!

घात निसर्गाचा । केला माणसा
लयलूट संसाराची । तुच केली ।।

मुक्या प्राण्यांचे । नाहक बळी
वनांची राख । तुच केली ।।

खोदले डोंगर । नद्याही वळवल्या
पाण्याचा लिलाव । तुच केला ।।

वरदान विज्ञान । शाप तुझ्या ठायी
अण्वस्त्र डागली । गगनापार ।।

तोंडी साखर । हाव मनी मलईची
नसता उठाठेवी । तुच केल्या ।।

कोरोना विषाणू। बुद्धिचा पराक्रम
अज्ञानाचा स्फोट। तुच केला ।।

मनी- जनी अहं। तुझा मिटेना।
अंतरी असंतोष । घर करी ।।

वेळ वेगवान । जाग तुला येईना
सारं केलं तरी ।’माणूस’ तु होईना ।।

◼️🔷✍️🔷◼️

कवी: संतोष गव्हले
(प्राथमिक शिक्षक)
केन्द्रीय विद्यालय, आयुध निर्माणी चांदा, जिला चंद्रपुर मो : 8669089027

◼️🔷◼️🔷◼️🔷◼️🔷◼️🔷◼️🔷◼️🔷◼️🔷◼️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *