◼️ काव्यरंग :- शंभूराजेंचा स्वाभिमान !!

!! शंभूराजेंचा स्वाभिमान !!

पाय तोडले तरी चालतील पण आधार कुणाचा घेणार नाही,
मरण आले तरी चालेल पण
शरण कधी जाणार नाही !! १ !!

जीभ कापली तरी चालेल पण प्राणाची भिक मागणार नाही,
हात तोडले तरी चालतील पण
शत्रू पुढे हात सोडणार नाही !! २ !!

डोळे फोडले तरी चालेल पण
नजर कुणापुढे झुकवणार नाही, मुंडके उडवल तरी चालेल पण
मान कुणापुढे वाकणार नाही !! ३ !!

विर छावा शंभूराजे यांनी
हार कधीच मानली नाही
मरणाच्या दारातही त्यांनी
स्वाभिमान कधी सोडला नाही !! ४ !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *