◼️ काव्यरंग :- प्रेम कसे असावे_

_प्रेम कसे असावे_

प्रेम,पाण्यासारखे नितळ असावे
प्रेम,दुधासारखे निर्मळ असावे
प्रेम,समुद्रासारखे अथांग असावे
प्रेम,आकाशासारखे विशाल असावे
प्रेम,शिंपल्यातील मोत्यांसारखे सुरक्षित असावे
प्रेम असावं तर झाडासारखं,
स्वतः उन्हात उभं राहून दुसऱ्यांला सावली देणारं…

प्रेम,सूर्याप्रमाणे तेजस्वी असावे
प्रेम,हृदयाच्या ठोक्याप्रमाणे सतत चालणारे असावे
प्रेम,चंद्रासारखे शीतल असावे
प्रेम,चांदण्याप्रमाणे लुकलुकणारे असावे
प्रेम,फुलांप्रमाणे मोहक व सुगंधी असावे
प्रेम असावं तर अश्रुंसारखं,
सुखासोबत दुःखातही साथ देणारं…

प्रेम,अमृतासारखे पवित्र असावे
प्रेम,योद्ध्यासारखे अजिंक्य असावे
प्रेम,पर्वतासारखे स्थिर व खंभीर असावे
प्रेम,वसुंधरेप्रमाणे परोपकारी असावे
प्रेम,वाऱ्यासारखे प्रवाही व धाडसी असावे
प्रेम असावं तर चंदनासारखे,
स्वतः झिजून दुसऱ्यांना सुगंध देणार…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *