!!.. मित्र ..!!
( विडंबन काव्य )
एकतरी मित्र असूदे
तुझ्या मनासारखा.. !! धृ !!
संकटे झेलायला
पुढे सैनिका सारखा,
मित्र संकटामध्ये
काजव्या सारखा..!1!
साथ सोडणार नाही
मी परक्या सारखा,
एक मित्र असुदे
पौर्णिमे सारखा..!2!
दुःख चिपकणार नाही
फेविकाॅल सारखा,
मित्र जर असेल तो
एक,वज्रा सारखा..!3!
संकटेही शिकार होतील
मित्र असता,वाघा सारखा,
मित्र संकटात असतो
तो आधारा सारखा..!4!
मैत्री ही असी असावी
माय लेकरा सारखी
जाऊनी,भेट त्याला
तू सुदाम्या सारखा..!5!
मा. जिल्हा संघटक संभाजीनगर औरंगाबाद
मो. 9325294198
◼️🔶◼️🔶◼️🔶◼️🔶◼️🔶◼️🔶◼️🔶◼️