◼️ काव्यरंग :- मी सैनिक भारतमातेचा

मी सैनिक भारतमातेचा

ऊंच हिमालय शिखरावर
झेंडा फडकतो डौलाचा,
उरी अभिमान बाळगतो
मी सैनिक भारतमातेचा !!
मनी असो कुणाच्या हेतू
स्वर्गभूमी हडपण्याचा
परि इंचही नाही देणार
मी सैनिक भारतमातेचा!!
होवो कितीही युद्ध हल्ले
परि हा इरादा लढण्याचा
तुटून पडेल मी शत्रूवर
मी सैनिक भारतमातेचा!!
आहे ज्वलंत अभिमान त्या
शहिदांचा अन् बलिदानांचा
मायभूसाठी होईल अमर
मी सैनिक भारतमातेचा!!
त्याग केला मी घरदार अन्
मातापित्यांच्या प्रेमाचा
व्यर्थ न जाणार बलिदान हे
मी सैनिक भारत मातेचा !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *