सडा तारकांचा..!
सडा तारकांचा तारांगणी
नटखट कान्हा चांदोबा गातो प्रेम गाणी
प्रेम वेड्या गोपिसम चांदण्या
तेजोमय लुकलुकत्या धगाआडच्या चांदण्या….!!१!!
पौर्णिमेच्या रात्री
जमली रासलीला अंबरी
गोपी राधा कृष्ण प्रेयसी
मुरलीधर बजाये बासरी….!!२!!
पिवळे अंबर
कोवळे रवी किरण
इंद्रधनुने सप्तरंगी
नभी बांधले तोरण…….!!३!!
पुष्कर उधळीत प्रेम रंग
लपंडाव खेळतो चंद्र ताऱ्या संग
तेजस्वी भास्कर किरणे
पडता तरू वेली सुमन नाचे हर्षाने …..!!४!!
मेघ दाटले, चंद्र तारे लुप्त झाले
प्रारंभला झुळझुळ वाऱ्याचा प्रवास
समुद्र सिंधू रत्नाकर सज्ज
आलिंगन घालण्या अंबरास…….!!५!
सदस्य, मराठीचे शिलेदार समूह
🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶