पालकमंत्री विजय वडेट्टीवार चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

पालकमंत्री विजय वडेट्टीवार चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

चंद्रपूर, दि. 15 ऑक्टोंबर: महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, इतर मागास, बहुजन कल्याणमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार 16 ऑक्टोंबरला चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.

त्‍यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. 16ऑक्टोबरला सकाळी 11 वाजता कमलाई निवास,रामदास पेठ नागपूर येथून ब्रह्मपुरीकडे प्रयाण करतील. दुपारी एक वाजता ब्रह्मपुरी येथे आगमन व गोसीखुर्द विश्रामगृह येथे गोसीखुर्द विकास कामाबाबत अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेणार आहेत. दुपारी चार वाजता ब्रह्मपुरी येथून नागपूरकडे प्रयाण करतील.◼️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *