माजी सैनिक, विधवांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती

माजी सैनिक, विधवांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती

अर्जाची अंतिम मुदत 31 जानेवारी 2021

चंद्रपूर,दि.15 ऑक्टोंबर: शैक्षणिक वर्ष 2019-20 मध्ये माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षेत किमान 60 टक्के गुणांनी उत्तीर्ण झालेल्या माजी सैनिकांच्या पाल्यांना जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीसाठी अर्ज स्विकारण्याची तारीख 15 ऑक्टोंबर 2020 अशी कळविण्यात आली होती. परंतु, कोविड- 19 च्या वाढत्या प्रादुर्भामुळे शाळा व कॉलेज आजपर्यंत सुरू झालेले नाहीत. त्यामुळे गुणपत्रिका व बोनाफाईड सर्टीफिकेट मिळण्यास विलंब होत आहे. या कारणास्तव अर्ज स्विकारण्याची तारीख आता 31 जानेवारी 2021 करण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी दिली आहे.

लाभार्थ्यांचा अर्ज, शिष्यवृत्ती फॉर्म, ओळखपत्राची छायांकित प्रत, बोनाफाईड प्रमाणपत्र, उत्तीर्ण झालेल्या वर्गाची गुणपत्रिकेची झेरॉक्स व इतर कुठल्याही योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती मिळत नसल्याचे प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्र अर्जासोबत जोडावेत. पंतप्रधान शिष्यवृत्ती अंतर्गत शिष्यवृत्ती घेणाऱ्या माजी सैनिकांच्या पाल्यांना जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाची शिष्यवृत्ती लागू होत नाही. तसेच सीईटी, जेईई किंवा इतर कारणासाठी गॅप घेऊन शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये प्रथम वर्षासाठी प्रवेश घेतलेला आहे, अशा विद्यार्थ्यांनी प्रकरणासोबत गॅप सर्टिफिकेट जोडावे. अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, प्रशासकीय इमारत, पहिला मजला, रूम नंबर ३, चंद्रपूर येथे संपर्क साधावा, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.◼️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *