परीक्षा
प्रेमाची वार्षिक परीक्षा
संसाराची अग्निपरीक्षा
गडी पास प्रथम आला
नवते कोठे व्यंग नकाशा…
परीक्षा कशी असते
एक प्रश्न दोन उत्तर
सोपे कठिण रीतीने
सोडवायचे गणित मास्तर…
वनवासही परीक्षा प्रकार
शिक्षा भोगण्याला होकार
बायको भांडायला तयार
मध्यस्थी कोण रे करणार….
चिटकोऱ्यासह रांगेहात
कॉपी बहाद्दर सापडला
रस्टीकेट करावे की नाही
केंद्रसंचालक विचारात बुडला…..
एटीकेटीने प्रमोशन झाले
प्रवेशाचे मार्ग खुलले
बदलाव तंत्र समायोजन
शैक्षणिक धोरण स्वागताले…..
निसर्गराजा घेऊ पाहतो
माझ्या बळीराजाची परीक्षा
कृषिप्रधान देश मातीत श्रम
सुपिक होण्याची आस प्रतिक्षा…
अनुभवाच्या शाळेत न बैसला
अभ्यासक्रम नव्हता कसला
अस कस कारट वरपास झाल
निरक्षरा माथी साक्षरतेचा वसा…