◼️ काव्यरंग :- टाळेबंदी

टाळेबंदी

कोव्हीड 19 विषाणू प्रसार पाहून
देशांनी घेतला निर्णय लॉकडाऊन

जनजिवन झाले एकदमच ठप्प
सर्वजण घराचे आत चिडीचिप्प

विमान रेल्वे वाहनावरती ही बंदी
कामकाज उद्योगधंदेस टाळेबंदी

धार्मीकस्थळे पर्यटन सर्वच बंद
ना सार्वजनीक कार्याचा आनंद

जगात आर्थीक मंदी लाट आली
अनेकांची फार उपासमार झाली

सरकारी यंत्रणांनी कंबर कसली
कोव्हीड योध्दे संरक्षणा धावली

असं पहीले युध्द जिंकूशकू भारी
सुरक्षीत राहून आपआपल्या घरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *