◼️ काव्यरंग :- नवरात्री देवींचे माहात्म्य ✍️ सौ.भारती सावंत, मुंबई

नवरात्री देवींचे माहात्म्य

आई करते तुझा गं उदो
तुझे डोंगरावर एक मंदिर
माता कार्ल्याची एकविरा
छोट्या गुहेचे हे प्रवेशद्वार

योगेश्वरी अंबेजोगाईची
हेमाडपंती शिल्पकाम
महाद्वाराला तीर्थसर्वेश्वर
मुकुंदराजांचे समाधीधाम

माहूरगडी रेणुकेचे स्थान
यादवराजाने बांधले मंदिर
तांदळास्वरूप मुखकमल
सूर्याचे तेज तळपे त्यावर

साडेतीन पीठात देवस्थान
शिलाहार राजांचे स्थापत्य
महाराष्ट्राची कुलस्वामिनी
माता अंबाबाई देवी स्तुत्य

करवीर निवासिनी माता
जगदंबारुपी तुच पावली
कोल्हापूरवासी बनुनिच
महाराष्ट्रावर तिची सावली

महाराष्ट्रात कुलदेवता दोघी
म्हाळसा बाणाईदेवी सवती
खंडोबाच्या दोन्ही या पत्नी
बेलभंडारा भाविक उधळती

औंधसंस्थांनात देवीचे स्थान
आदिशक्तीचा इथे असे वास
सप्तमातृकावरून यमाई नाव
औंधासूरवधाचा तिला ध्यास

पंढरपूर तालुक्यातले गाव
कनकंबा अंबाबाई अवतार
करकंब गाव झाले प्रसिद्ध
ऐतिहासिक वेस दिमाखदार

मांढरदेवी प्रसिद्ध सातारची
माता पार्वतीच ती अवतरली
लाख्यासूराचा करूनी वध
काळुबाई प्रसिद्धीला पावली

विरारची जीवदानीदेवीस्थित
जीवनदानाचे जाणुनि मातेने
राजा दक्षाच्या घोर अपमाने
करविले तर्पण शरीर अग्नीने

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *