◼️ काव्यरंग :- तूझ्या आठवणी…

… तूझ्या आठवणी…

तूझ्या आठवणी म्हणजे
मोरपीसाचा हळुवार स्पर्श
तूझ्या आठवणी म्हणजे
नकळत निर्माण होणारा हर्ष….

तूझ्या आठवणी म्हणजे
स्वप्नानी सजलेला एक गाव
तूझ्या आठवणी म्हणजे
विरह सागरात हरवलेली नाव….

तूझ्या आठवणी म्हणजे
आयुष्य जगण्याची आशा
तूझ्या आठवणी म्हणजे
गमावलेल्या गोष्टींची निराशा….

तूझ्या आठवणी म्हणजे
पावसात चिंब भिजण
तूझ्या आठवणी म्हणजे
ओसाड वाळवंटात एकटाच भटकण….

तूझ्या आठवणीशिवाय
आयुष्य अर्थहीन आहे
तूझ्या आठवणींचा सहवास
हाच माझ्या आयुष्याचा रंग आहे….

🔷🔶✍️🔶🔷

कवी:- राज गुरनुले
मु.पो.गुंजेवाही(कोठा), ता.सिंदेवाही जि.चंद्रपूर
मो.नं.9527873626

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *