◼️ काव्यरंग :- पाणी पाणी झाले रानी..

पाणी पाणी झाले रानी..

गेलं अभाळ वाहून सारं,
पीक माती मोल झालं…..
बांध फुटला नशिबाचा
गाव पाणी पाणी झालं….

सुर्य उगवला आज,
एक लेवुनीया डाग…
घाम तरंगला पाण्यात
जिव्हे लागली आग…

कुंपन विचारे शेताला,
कुठे गेला तुझा धनी…
सारी उखडली तटकाटी,
पाणी पाणी झाले रानी…

पिक पिल्लावानी जोपलं,
हाती मिळाला ना घास…
पायी पायी किती जोडली
कर्जात अडकला श्वास…

बळी राजाच्या घराला
लागलं दारिद्रयाचं ढवाळं…
स्वप्नं गिळतो आयुष्यांच
किती भुकेललेला काळ….

सांग सांग देवा पांडूरंगा,
काय देशील रे दान…
पुन्हा आभाळ बरसूनी
वाहून नेशील का रे रान…
वाहून नेशील का रे रान…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *