वैरी….
तो तुझा तोरा आज भांडून गेला
श्वास माझा त्यानेच कापून नेला…
ज्यात मी माझा प्राण ओतून गेलो
तो दिवा ही अंधार सोडून गेला..
मी कसे सांगू घात केला फुलांनी ?
ओळखीचा पाऊस जाळून गेला…!
रंग प्रेमाचा ओळखेना मलाही
जीवघेणा तो खेळ मांडून गेला…
कोणता झाला देव सांगा भिकारी
रक्त जो नैवद्यात मागून गेला…
लागतो वैरी कोण माझा अताही
शेवटी तो ही हात जोडून गेला…