◼️ काव्यरंग :- ती एक आईच असते ..!!

!!.. ती एक आईच असते ..!!

जन्म देताना मरणकळा मी भोगेण
रात्रीचा दिवस मी सहन करीन पण
आयुष्यभर सतत तुलाच आनंद मिळूदे
असं म्हणणारी,ती एक आईच असते..!1!

एखाद्या सुंदर परी सारख्या मुलीशी
माझ्या मुलाचं थाटात लग्न व्हावं
दोघांनी आनंदात संसार करावा
असं म्हणणारी,ती एक आईच  असते..!2!

जन्म देताना झालेल्या वेदना विसरून
पालन-पोषणातले कष्ट सहन करून
हे सर्व मी स्वेच्छेने स्वीकारले होते
असं म्हणणारी, ती एक आईच असते..!3!

आईपणाचा आनंद तुच तर दिलास
सर्व सुख समाधान तुलाच मिळू दे
शंभर वर्ष आयुष्य तुलाच मिळू दे..
असं म्हणणारी, ती एक आईच असते..!4!

संभाजी ब्रिगेड, मा.जिल्हा संघटक
संभाजीनगर औरंगाबाद, मो. 9325294198

◼️🔶◼️🔶◼️🔶◼️🔶◼️🔶◼️🔶◼️🔶◼️🔶◼️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *