◼️मर्मबंध लेख :- रक्ताने माखलेले हात- ललित

रक्ताने माखलेले हात- ललित

आज तु मला कळवळून आठवलिस. पण, काय तु मला कुठं मनात साठवलीस? तशी तु माझ्यापासून दूर….. कल्पनेच्या पलीकडचिच! तु पुर्व तर मि पश्चिम दिशा. मि आकाश तर, तु धरती…… तुझ्या माझ्यात अंतर आणि अंतरच. एकमेकांपासून जन्मांतरिचं अलिप्त.

तुझ्या रंगात रंगुनी रंग माझा वेगळा, असं म्हटलिस तरी चालेल. बागेतील रंगबेरंगी फुलांना बघुन तुझ्या – माझ्यातल्या प्रेमरंगातली आठवण झाली. अन् डोळे पाणावलेत माझे. आठवतेय सांजरंगात रंगलेली तु. अन् पहाटे पहाटे बेरंगी झालेला मी. तसं काँलेजातला तुझा माझा रंग ईंद्रधनुसारखाच. पण का कुणास ठाऊक? नियतीने पाट फिरवली, अन् मि झालो रंगहीन!……. तुला मात्र रंगाचा खुळा नाद, म्हणून तु सप्तरंगात न्हाऊन निघालिस. पुढे काँलेज संपलं तुझं. तु माझ्यापासून दुर गेलिसही!….. माझं काळ मात्र तिथेच थांबला. तुझ्या प्रेमाच्या विरहासंन्न वेदना सोसत……. मि राहीलो तिथेच एकाकी रंगहीन आयुष्य जगत….. खरं म्हणजे? तुझ्या प्रेमरंगात रंगणे नशिबातच नव्हतं माझ्या. विरहाच्या बेरंगात सतत तरंगत राहिलो. तुझं प्रेम तर, दूरच : तुझ्यातल्या माणुसकिचं आधारही मिळाला नाही!…… जशी काही तु माझ्या तप्त भावनांच्या तव्यात आपल्या स्वार्थाची पोळी भाजून दुरावलेली! संधीसाधु निलँज्ज मुलगी!…… मि मात्र प्रेमवेडा तुझ्या आठवणीत दंग राहिलो. तुला कदर नव्हती माझ्या प्रेमाची? माझ्या भावभावनांची, अन् त्यातल्या रक्तरंजित वेदनांची? म्हणून तु गेलिस कायमची, संसाराचा रंगोत्सव साजरा करण्यासाठी!…

आता माझ्या संग कुणीच नाही! तुझ्या संग मात्र रंग….. माझ्या वाट्याला फक्त प्रेमभंग…… तु झालिस रंगात बेधुंद….. मि राहीलो प्रेमरंगात श्रापित!

मि तुझ्या प्रतिक्षेत कितीतरी दिवस घालवलेत, पण तु आली नाहीस. कालांतराने कळत-नकळत तु हळदीच्या रंगात पिवळी झालिस. मेहंदीच्या सुवासिक रंगात तु रंगलीस नववधुसारखी!……. हिरव्या शालुने प्रेमरंगात मळवलं तूला. खणखणित हिरव्या चुळ्याने भुलवलं तुला.
तु झलिस परक्याची!….अन् संपला माझ्या आयुष्यातील प्रेमाचा रंगोत्सव…… तुझ्या अंगणातील रांगोळीच्या नक्षी प्रेम रंगानी भरून गेल्यात. तुझ्या हातावरील मेहंदीच्या रंगानी तुझी ओंजळही भरली.सनई चौघड्यांच्या सप्तसुरात तुझा विवाह मंडपही झंकारलं. माझे हात मात्र रिकामेच राहिले, तेही रक्ताने माखलेले!…… मि झालो तुझ्या प्रमरंगातुन कायमचा वजा….. शेवटी तुझ्या विरहात रक्ताच्या रंगानी रक्तरंजित झालो, अश्वस्तामाच्या जीवघेण्या जखमेसारखं अनादर काळासाठी!…….

तु मात्र झालिस संसारिक रंगात सप्तरंगी…. मि मात्र आजही तस्साच: जोग्यासारखा नाउम्मेद रंगहीन!….. तुझा तो मनगटावर कोरलेला नावही तसाच: ताजातवाना रक्तरंजित. माझी नजर मात्र रीती झालेली! माझे हातही तसेच रिकामेच रक्ताने माखलेले!……..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *