◼️ काव्यरंग :- वेळ

... वेळ…

वेळ खूप ताकदवान असते
माणसाला माणसाची औकात दाखवायची
ताकद वेळेत असते…

वेळ माणसाला जगायला शिकवते
स्वार्थपणाचा माज केल्यावर
माणसाला होत्याच नव्हतं करून टाकते…

वेळ माणसाला माणूस बनवते
वेळ देऊनही धडा न घावणाऱ्याची
वाट लावण्याची हिम्मत वेळेत असते…

वेळ माणसाला माणुसकी शिकवते
माणसाचा मी पणाचा घडा भरतो
भरलेला घडा फोडण्याचा काम वेळच करते…

वेळ खूप काही शिकवते
झालं गेल विसरून आयुष्यात
माणसाला पुढे चालायला वेळच शिकवते….

कवी:- राज गुरनुले
मु.पो.गुंजेवाही (कोठा),ता.सिंदेवाही जि.चंद्रपूर,मो.नं. 9527873626

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *