◼️ काव्यरंग :- गोंधळगीत

गोंधळगीत

आई उदे गं अंबाबाई, आई उदे गं भवानी आई
“मुलगी वाचवा अभियान”आई, स्त्रीशक्ती जागर बाई
॥धृ॥

रेणुका मातेची माया, सप्तशृंगी मातेची छाया
श्री गणेशाची गाया, आरती पडाया पाया,
स्त्री शिक्षणाची संबळ, तू लेकींसाठी आभाळ
साद घाली गं बाळ, न आई तुला घालितो गोंधळ॥१॥

शैलपुत्री, ब्रम्हचारिणी, चंद्रघटा वरदायिनी,
कुष्मांडा, स्कंंदमाता नि, आई कात्यायिनी,
कालरात्री, महागौरी बळ, सिद्धियात्री असूरा काळ
कोरोनाला पिटाळ, न आई तुला घालितो गोंधळ॥२॥

जीजा, लक्ष्मी रणधीर, सावित्री, आनंदी शिक्षणशूर
बहिणाबाईंचे सूर, सरोजिनी स्वातंत्र्यवीर
कल्पनास अंतराळ, किरण, मीराचंं संरक्षण दळ
नवदुर्गा मांदियाळ, न आई तुला घालितो गोंधळ॥३॥

◼️🔶🔷✍️🔷🔶◼️

सौ. प्रिया प्रकाश गावडे, ठाणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *