गेल्या 24 तासात 185 नव्याने बाधित ;दोन बाधितांचा मृत्यू

जिल्ह्यात आतापर्यंत 11137 बाधित झाले बरे

गेल्या 24 तासात 185 नव्याने बाधित ;दोन बाधितांचा मृत्यू

Ø उपचार घेत असलेले बाधित 3037

Ø जिल्ह्यातील एकुण बाधितांची संख्या 14387

चंद्रपूर, दि. 23 ऑक्टोबर : जिल्ह्यात गेल्या 24 तासात कोरोनामुळे दोन मृत्यू झाले असून 185 नवीन बाधितांची भर पडली आहे. आतापर्यंत बाधितांची एकूण संख्या 14 हजार 387 वर पोहोचली आहे. तसेच 24 तासात  123  बाधित कोरोनातून बरे झाल्याने सुरवाती पासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 11 हजार 137 झाली आहे.  सध्या 3 हजार 37 बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 13 हजार 765  नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 97 हजार 825 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

आज मृत्यू झालेल्या बाधितांमध्ये चंद्रपुर शहरातील सुमित्रा नगर  येथील 40 वर्षीय पुरुष व बल्लारपूर शहरातील झाकीर हुसेन वार्ड येथील 73वर्षीय महिलेचा समावेश आहे.  जिल्ह्यात आतापर्यंत 213 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 202, तेलंगाणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली तीन, यवतमाळ पाच आणि भंडारा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

तालुकानिहाय बाधितांची संख्या:

जिल्ह्यात 24 तासात पुढे आलेल्या बाधितांमध्ये 113 पुरूष व 72 महिलांचा समावेश आहे. यात चंद्रपूर शहर व परिसरातील 75 बाधित, बल्लारपूर तालुक्यातील 8, चिमूर तालुक्यातील 3, मुल तालुक्यातील 4, गोंडपिपरी तालुक्यातील एक,  कोरपना तालुक्यातील 15, ब्रह्मपुरी तालुक्यातील 12, नागभीड तालुक्यातील 18,  वरोरा तालुक्यातील 15,भद्रावती तालुक्यातील 6, सावली तालुक्यातील 5,  सिंदेवाही तालुक्यातील 13, राजुरा तालुक्यातील 3, गडचिरोली येथील 5 तर यवतमाळ व राजस्थान येथील प्रत्येकी एक असे एकूण 185 बाधित पुढे आले आहे.

या ठिकाणी आढळले शहर व परिसरात बाधित:

चंद्रपूर शहरातील व परिसरातील आंबेडकर नगर बाबुपेठ, बालाजी वार्ड, पठाणपुरा वार्ड, बाजार वार्ड, ओमकार नगर, हॉस्पिटल वार्ड, गोपाल पुरी, वडगाव, लक्ष्मी नगर, इंदिरानगर, कृष्णा नगर, गणेश नगर, स्वावलंबी नगर, सौगात नगर, भिवापुर वॉर्ड, रयतवारी कोलरी परिसर, सिद्धार्थ नगर, विकास नगर, ऊर्जानगर, गुरु नगर, अष्टभुजा वार्ड, लुंबिनी नगर, महेश नगर, संगीत नगर, भाना पेठ वार्ड भागातून बाधित पुढे आले आहे.

ग्रामीण भागात या ठिकाणी आढळले बाधित:

बल्लारपूर तालुक्यातील  साईबाबा वार्ड, गौरक्षण वार्ड, बिल्ट कॉलनी परिसर, विसापूर, विद्यानगर वार्ड, सुभाष वार्ड भागातून बाधित ठरले आहे.वरोरा तालुक्यातील आनंदवन परिसर, बावणे लेआउट, माजरी खदान परिसर, अभ्यंकर वार्ड, करंजी, शांतीवन  परिसरातून पॉझिटीव्ह पुढे आले आहे.

ब्रह्मपुरी तालुक्यातील सुंदर नगर, नवेगाव पांडव, विद्यानगर, भगतसिंग वार्ड, सुलेझरी, रमाबाई चौक, शांतीनगर परिसरातून बाधित ठरले आहे.भद्रावती तालुक्यातील स्नेहल नगर, गुरु नगर, सुरक्षा नगर, शिवाजीनगर परिसरातून पॉझिटिव्ह पुढे आले आहे.

राजुरा तालुक्यातील चुनाभट्टी वार्ड, विहिरगाव,भागातून बाधित पुढे आले आहे. चिमूर तालुक्यातील क्रांतीनगर,डोमा भागातून बाधित ठरले आहे. सिंदेवाही तालुक्यातील तातेवार सभागृह परिसर, नवरगाव, अंतरगाव परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे.

नागभीड तालुक्यातील बाळापुर, सावरगाव, कन्हाळगाव, तळोधी, सुलेझरी, नवेगाव पांडव भागातून बाधित पुढे आले आहे. कोरपना तालुक्यातील गडचांदूर,काटलबोडी भागातून बाधित ठरले आहे.◼️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *