आतुरता
माझा रंगीतसंगीत खडू
आतुरतेने माझी वाट पाहतोय
माझा काळा काळा फळा
मला ये म्हणून खुणावतोय…
पण हाय! काय करावे दैवा?
मला बाहेरच पडता येईना
कोरोनाने हाहाकार माजवलाय
काही केल्या काही सध्या उमजेना….
माझी मुलं नाचताना आठवतात
निरागस चेहरे डोळ्या समोर येतात
बाई,बाई ,बाई हाक कानी येते
सतत हेच भास होत होतात….
अभ्यास देतेय व्हाॅटसॅपवर
पण तन,मन शाळेत असे झालेय
कधी माझ्या पाखरांना भेटतेय
असे मला सदोदितच वाटतेय…..
तो परिपाठ,ती चिमणीपाखरं
सारे सारे मी खूप मिस करतेय
त्यांचे माझ्यावरील अतोनात प्रेम
खरचच सतत मला आठवतेय,……
🔷🔶◼️✍️◼️🔶🔷
वसुधा नाईक,पुणे
सदस्या मराठीचे शिलेदार समूह