गावाचा सुपुत्र निघाला आर्मीत; गावकऱ्यांनी दिला आगळावेगळा निरोप  

गावाचा सुपुत्र निघाला आर्मीत; गावकऱ्यांनी दिला आगळावेगळा निरोप  

मूळचा भंगाराम तळोधी तालुका गोंडपिपरी जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी 19 वर्षाचा तरुण असणारा महेंद्र गजानन राऊतवार यांची काही दिवसांपूर्वीच भारतीय सैन्यासाठी निवड झालेली होती परंतु ठरवून दिलेले कागदपत्र वेळेत सादर न केल्यामुळे नोकरीवर आपण रुजू होणार किंवा नाही असा मोठा प्रश्न महेंद्र समोर पडला होता.

गोंडपिपरी ( जि. चंद्रपूर)  – कोरोनाच्या संकटकाळात एका गरीब कुटुंबातील एकोणवीस वर्षीय तरूणाला गोड बातमी मिळाली. बातमी होती भारतीय सैनिकात निवड झाल्याची. चंद्रमोळी झोपळीत कसबस संसाराच रहाटगाडग चालवणाऱ्या आईवडिलांना या माहितीन अक्षरशः भरून आल.गावच्या गल्लीत आपणासोबत खेळणारा मित्र सैनिक होतोय या भावनेन अतिआनंदी झालेल्या गावातील तरूणांनी वाजतगाजत,फटाके फोडून,ढोलताशाच्या गजरात फटाखे फोडून आपल्या सूपुत्राला निरोप दिला.हा प्रसंग बघतांना उपस्थीतांचे डोळे आपसूचक पाणावले.

मूळचा भंगाराम तळोधी तालुका गोंडपिपरी जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी 19 वर्षाचा तरुण असणारा महेंद्र गजानन राऊतवार यांची काही दिवसांपूर्वीच भारतीय सैन्यासाठी निवड झालेली होती परंतु ठरवून दिलेले कागदपत्र वेळेत सादर न केल्यामुळे नोकरीवर आपण रुजू होणार किंवा नाही असा मोठा प्रश्न महेंद्र समोर पडला होता. परंतु या सर्व बाबींना दूर सारत महेंद्रने यावर मात केली आणि अखेर त्याची अंतिम निवड भारतीय सैन्यात करण्यात आली.

महेंद्र हा सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर येथे बीए प्रथम वर्षाला शिक्षण घेणारा विद्यार्थी होता. जिद्द ,चिकाटी आणि मेहनत या तीनही गोष्टीची साद घालत महेंद्रने केलेली मेहनत आज फळाला आली… महिंद्रा हा एका गरीब शेतकऱ्याचा मुलगा देशसेवेसाठी तयार होतो आहे हि निश्चितच  गावकऱ्यांना आनंदाची बाब होती .

22 ऑक्टोंबर रोजी महेंद्र बेंगलोर येथे होणाऱ्या ट्रेनिंगसाठी निघाला त्यावेळेस गावकऱ्यांनी जल्लोष साजरा करत महेंद्र चा सन्मान केला.आणि गहिवरल्या मनानी त्याला गावकर्यानी निरोप दिला. चंद्रमोळी झोपडीत रहाणार्या  गरीब कुटुंबियांतील एका तरूणाची भारतीय सैन्यात निवड झाल्याने गोंडपिपरी तालुक्यातील तरूणाईत उत्साहाचे वातावरण पसरले आहे.◼️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *