मराठीचे शिलेदार कविता, चारोळी समूहातील सर्व समूहात दि २४/१०/२०२० रोजी घेण्यात आलेल्या ‘शनिवारीय काव्यस्तंभ‘ स्पर्धेतील ‘सिमोलंघन’ या विषयावरील सर्वोत्कृष्ट ३ काव्यरचना. आपले मत, सूचना व अभिप्राय ‘सप्तरंगास’ कळवावे.
◼️🔷 सिमोल्लंघन 🔷◼️
आसू घेवू हसू देवू
कुणी राहू नये दुःखरा
“देण्याचे” सोने लुटू
दसरा करू हसरा… //
जसा आपट्याच्या पानाला
आकार आहे ह्रदयाचा
तसा माणसाच्या मनाला
स्पर्श असावा माणुसकीचा
आज आहोत उद्या नसू
भान याचे ठेवू जरा
“देण्याचे” सोने लुटू
दसरा करू हसरा… //
येणाऱ्याचे जाणे निश्चित
निश्चिंतपणे जीवन जगावे
‘नसण्यातल्या’ दुःखापेक्षा
‘असण्यातले’ सुख जपावे
हसण्याचे मोल जाणा
रडणे थोडेसे विसरा
“देण्याचे” सोने लुटू
दसरा करू हसरा… //
जीवन खरेच सुंदर आहे
आयुष्य खूप सिमित आहे
उद्याच्या व्यर्थ चिंतेत
आजचा आनंद गमावू नये
आनंदाची देवाण घेवाण
आनंदाचाच वाढवू पसारा
“देण्याचे सोने लुटू
दसरा करू हसरा… //
सोनेरी भाव भावनांचे
आज व्हावे सिमोल्लंघन
जे जे अनिष्ट,दुष्ट,अधर्मी
या सर्वांचे व्हावे निर्दालन
स्वतःतल्याच रावणी वृत्तीचे
चला आज दहन करू जरा
” देण्याचे”सोने लुटू
दसरा करू हसरा…. //
विष्णू संकपाळ, बजाजनगर, औरंगाबाद
©सदस्य मराठीचे शिलेदार समूह
🍃🔥🍃🔥🍃🔥🍃🔥🍃🔥🍃
-ll सिमोलंघन ll-
या तंत्रज्ञानाच्या युगात
माणूस खुप गुंतला
दोन पैसासाठी तो
मागे मागे धावत सुटला
वाणीत गोडवा ठेवून
इच्छा आपुली पुर्ण करतो
बळीचा बकरा शोधण्यास
नवे नवे डावपेच आखतो
भ्रष्टचाराला खतपाणी घालून
माणुसकीचे उल्लंघन करतो
झोळी आपलीच भरून
खापर दुस-याच्या माथी मारतो
गोरगरीब जनतेला फसवून
पैशाच्या ढिगावर विराजमान होतो
दृष्ट विचारांची पेरणी करून
माणुसकीला काळीमा फासतो
अशांना धडा शिकविण्यासाठी
आपण एकजूट सारे होऊ
थोर महापुरुषांच्या कार्याचां
वसा हाती घेऊन पुढे पुढे नेऊ
नव्या विचारांची पेरणी
जनमाणसाच्या मनामनात रूजवू
समाजातील लबाड,पाखंडी, देशद्रोहीनां
दृष्ट विचारांचे सिमोलंघन
मनातून दहन करायला लावू
श्रीमती सुधा अश्वस्थामा मेश्राम
अर्जुनी/मोर.गोंदिया
©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समुह
🍃🔥🍃🔥🍃🔥🍃🔥🍃🔥🍃
सिमोलंघन
सिमोलंघन व्हावे…
समाजातील अनिष्ट, वाईट रुढी-परंपरांचं.
स्त्रीला कायमच हीन समजणाऱ्या भावनेचं.
सिमोलंघन व्हावे….
कोरोनारुपी महाराक्षसाचं.
तळागाळातील वंचितांचं जगणंही मुश्किल करणाऱ्या महामारीचं.
सिमोलंघन व्हावे….
आपल्यातील ‘अहं’पणाचे.
पीडितांच्या वेदनांकडे
दुर्लक्ष करणाऱ्या बोथट मनातल्या रावणाचं.
सिमोलंघन व्हावे….
प्रत्येक क्षेत्रातील भ्रष्टाचाराचं .
गरजूंच्या पैशावर डल्ला मारणाऱ्या
अघाशी कोल्ह्यांचे.
सिमोलंघन व्हावे….
देशातील दहशतवादाचं.
अदॄश्य चेहरा घेऊन फिरणाऱ्या
मानवजातीच्या दुश्मनाचं.
आणि यावं रामराज्य
वेदनांची स्पंदनं जाणून
घेणाऱ्या मनुष्यजातीचं .
फुलावं नंदनवन सुख-समृद्धीचे.
सौ जयश्री पंकज मराठे.,नाशिक
©️ सदस्या- मराठीचे शिलेदार समूह
🍃🔥🍃🔥🍃🔥🍃🔥🍃🔥🍃
मुख्य प्रशासक/संपादक
राहुल पाटील
७३८५३६३०८८
मुख्य परीक्षक/प्रशासक
सौ सविता पाटील ठाकरे
➖➖➖➖🍁🌿🍁➖➖➖➖
🔷🔶🔷🔶🔷🔶✍️🔶🔷🔷🔶🔷🔶