नवदुर्गा
आई वडीलांचा पंचप्राण आहेस तू,
कन्यारत्नच नाही तर अनमोल रत्न हो तू,
स्वकतृत्वाचा आलेख उंचावत उंच ने तू,
नवयुगाची,नवक्रांतीची,नवदुर्गा हो तू …
असंख्य संकटे येतील चौफेर तुजला,
प्राणपणाने कर त्यांचा यशस्वी सामना ,
तुझ्या पंखांनी घे तू उंच उंच भरारी,
नवयुगाची, नवक्रांतीची,नवदुर्गा हो तू …
असाध्य ही साध्य होईल तुझ्या प्रयत्नांती,
आत्मविश्वासाने तुझ्या प्रगतीची वाढेल गती,
मनात राहू दे पेटती मशाल क्रांतीची,
नवयुगाची,नवक्रांतीची,नवदुर्गा हो तू …
नसावी कायम घरच्यांना चिंता तुझी,
तूच हो तुझ्या जीवन रथाची सारथी,
जिजाऊ,आहिल्या, सावित्री यांचा वारसा घे हाती,
नवयुगाची ,नवक्रांतीची,नवदुर्गा हो तू …
◼️🔶🔷✍️🔷🔶◼️
कवी:-सिध्देश्वर दिलीप वायाळ,
मु.सावरखेडा (गोंधन), पो.सिपोरा (अं),
ता.जाफ्राबाद, जि.जालना- ४३१२०६.
फोन नं (व्हाटस अॅप नं) ९९२२४६२९०९.
ई-मेल- siddheshwarwayal74@gmail.com
◼️🔷◼️🔷◼️🔷◼️🔷◼️🔷◼️🔷◼️🔷◼️🔷◼️