◼️ काव्य रंग : माता रमाई

!!! माता रमाई !!!

दुसऱ्याच्या सुखात आपलं

सुख मानणारी होती माता रामई,
फाटक्या संसाराचा आधार होती
धिराची माझी माता रमाई !!1!!

आयुष्यभर डॉ.बाबासाहेबांच्या
सुख दुःखात सामील होणारी,
ठिगळाची साडी वापरूनही
तक्रार कधिही न करणारी रमाई !!2!!

मांग जातीचा मुलगा कचरू
त्याचाही सांभाळ करणारी आई,
मुली समान सांभाळ करूण
अशोक नामकरण करणारी रमाई !!3!!

बॅरिस्टर साहेबांची सावली रमाई
नऊ कोटीची राणी होती रमाई,
दीनदुबळ्यांची माऊली रमाई
क्रांतीसूर्य शिल्पकाराची रमाई !!4!!

बाबासाहेबांची सावली रमाई
संकटकाळी ती धावली रमाई
महिला शक्तीची प्रेरणा रमाई
रूढी-परंपरा मोडणारी रमाई !!5!!

संकटांशी ती सदा लढली
नाही खचली,नाही रडली
रात्रंदिस वाहे चिंता मनाला
भिम चरणाशी निवांत बसली !!6!!

◼️✍️◼️

शिवकवी शिवश्री अडसूळ पाटील,

संभजी ब्रिगेड, मा.जील्हा संघटक, संभाजीनगर, मो.93 25 29 41 98

◼️🔷◼️🔷◼️🔷◼️🔷◼️🔷◼️🔷◼️🔷◼️🔷◼️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *