◼️ ललित लेख :- श्रावणधारा

श्रावणधारा 

दरवेळेस श्रावणधारा येतात ओल्याचिंब आठवणी घेऊन….. कोरड्या पडलेल्या मनाला मिळतो शितल गारवा. दाही दिशा होतात चिंब नि चिंब. भेगाळलेली वसुंधरा हिरवळित होते रुपांतरीत. हळुवार आठवते मग हिरव्या मनाची हळवी सखी. नकळतच मन हरवुन जातो तिच्या कडू गोड आठवणींच्या भावविश्वात. तिच्या संगतिने मनात फुलवतो पुन्हा एक प्रितिचा गुलमोहर……. अन् मग या श्रावणधारेत बहरत जाते सोज्वळ प्रेमाची रोमांचित कहानी…… संथगतीने येतात मनात असंख्य प्रश्न….. मग त्या प्रश्नात गुंतत जातो हळवं कवी मन…… माहेरी कशी बरं असेल ती?….. तिलाही आठवण येत असेल का माझी?…… कदाचित तिही असेल का विचाराधीन?

या श्रावणधारा तिच्या माझ्या प्रेमाच्या. माझ्या गावापासून दुरवर लांब असलेला तिचा तो फुलांच्या गावातलं वास्तव्य. मग सहज म्हणून झालेली ओळख. अन् पुढे जाऊन बहरलेली काँलेजातली मैत्री….. त्यातुन फुललेलं अव्यक्त प्रेम. मग कळत नकळत एकाच छत्रिचं आधार. वादळाने हिरावुन घेतलेली ति फाटकी छत्री….. अन् भिजलेंलं पहिलं वहिलं प्रेम…… मग पुढे पळुन जाऊन केलेलं लग्न……आणि तो श्रावणधारेत भिजलेला फाटका संसार. त्याचाच एक सुंदरसा प्रवास कधी हसवतो तर, कधी रळवतो……..

तिच्या हातात हात गुंफून शेताशिवारात जानं, शेतातली संगतिनं कामं करणं, हि प्रेमसंसाराची पावतिच…! रोवनी करतांना चिखलाने माखलेले तिचे हात, खणकणार्या बांगळ्या, भिजलेली ति साडी, गालातल्या गालात हसणं, अन् तिचं ते मला एकटक बघतच राहावं असं मुर्तिमंत सौदयँ…… मुसळधार श्रावणधारेत चिंब भिजलेले आम्ही दोघेही पती- पत्नी संसाराचे प्रतिकच होतो.

दोघांच्याही मनात फुललेल्या त्या नाजुक कोमल भावना…. तिच्या काळ्याशार केसांमधुन निथळणारे श्रावणधारेचे थेंब…… अन् केसांवर पडलेल्या त्या पाण्यामुळे तयार झालेलं सप्तरंगी तुषार, अधिकच विलोभनीय…… सोबतीला असणारा तो थंडगार वारा. अन् त्यामुळे हवाहवासा वाटणारा तिचा तो सहवास. तिच्या सोबत शेतात घालवलेला एकेक क्षण दोघातिल संसारिक बंध आणकिनच द्रूढ करत होता. चिखलात पाय घसरून पळतांना
तिला सावरायला फुढे केलेला माझा हात, हमसफर असण्याची साक्ष देत होता.

माझा हात ति हाती घेतांना, तिच्या चेहर्‍यावर
स्मिथ हास्य टवटवीत फुलासारखं फुललेला. तिच्या सोबत शेतात राबतांना, अखंडपणे बडबड करणारी ती. श्रावणधारेत भिजतांना मात्र काहिसा अबोल झालेला मी. अशा स्थितीत मुद्दामहून एकदूज्याकडे टाळले जाणारे मोहक चोरटे कटाक्ष. आणी त्यामुळे दोघांच्याही चेहर्‍यावर फुलणारं अकारण हसु , आमच्यातिल अनामिक जपल्या संसाराची विन आणखिनच घट्ट करित होतं. त्या श्रावणधारेत दोघेही, दिशाहीन भटकत होतो. अगदिच निर्विकारपणे!……..

आता ति नाही सोबतिला माझ्या. कारण- ति गेली माहेरी. आहेत ते फक्त काही बैचन करणार्‍या आठवणी. अजुनही मि तिची वाट बघतोय. ति येईल, कारण- माझा तिच्या शब्दांवर आजही विश्वास आहे. तिनं मला म्हटलं होतं, कि मी फक्त तुझिच आहे….. तुझिच राहणार…. तुझ्याच नेत्रातुन मी सारे जग पाहणार…… वाट बघ मी नक्कीच परत येईन ! संसाराचे श्रावणधारा झेलण्यासाठी….!

◼️🔷◼️🔷◼️🔷◼️🔷◼️🔷◼️🔷◼️🔷◼️🔷◼️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *